बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! अभिनेत्री आणि तिच्या बहिणीवर बलात्कार करुन केलं ‘हे’ लज्जास्पद कृत्य

पालघर | नायगाव येथील रहिवासी असणाऱ्या अभिनेत्रीसोबत एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी कष्ट करणाऱ्या एका अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर आरोपींनी अभिनेत्रीच्या बहिणीवर देखील बलात्कार केला असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात एकूण 5 आरोपी असून केवळ अत्याचार करुन आरोपी गप्प नाही बसले. अभिनेत्री आणि तिच्या बहिणीला आरोपींनी लज्जास्पद कृत्य करण्यास देखील भाग पाडला.

संबंधित घटना ही कर्नाटकमध्ये घडली आहे आहे. नायगाव येथील रहिवासी असणाऱ्या अभिनेत्रीच्या बहिणीला आरोपी महासुबेर परिद याने मद्यामधून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर अभिनेत्रीवर जबरदस्तीने अत्याचार करुन अश्लील चाळे केले. एवढंच नाही तर तिच्या बहिणीवरही जबरदस्तीने अत्याचार केला.

आरोपी केवळ अत्याचार करुन गप्प बसला नाही. त्याच्यासोबत असणाऱ्या आरोपी रमेश याने दोन्ही बहीणींचे हात धरुन स्वत: जवळ ओढून अश्लील चाळे करुन अत्याचार केले. तर आरोपी सुधीरकुमार चंद्रशेखर, अभिनव विख्यात, जगन्नाथ यांनी दोन्ही बहिणींना अर्धनग्न कपडे परिधान करण्यास सांगून त्यांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. तसेच अश्लील काम करण्यास भाग पाडले.

दरम्यान, संबंधित अभिनेत्री आणि तिच्या बहिणीने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच संपुर्ण प्रकारानंतर अभिनेत्रीने वालीव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटना ही कर्नाटकातील असल्यामुळे याबाबतची तपासणी आणि चौकशी वालीव पोलिसांनी कर्नाटक पोलिसांकडे सोपवली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘ग्रामीण भागात लस मिळेना’; शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

बुधवार पेठेत महिलेची हत्या केलेल्या आरोपीला अटक, ‘असा’ होता कट

लूडो गेम खेळण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय नराधमाने 2 अल्पवयीन मुलींसोबत केलं ‘हे’ दुष्कृत्य

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; चांदिवाल समितीला दिवाणी अधिकार

‘या’ जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या साडेसात हजारांवरून थेट 3 हजारांवर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More