बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! गौतम गंभीरला मिळालेली जीवे मारण्याची धमकी पाकिस्तानातून

मुंबई | भारतीय क्रिकेट टीमचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला (Gautam Gambhir) काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.

गौतम गंभीरला इसिस काश्मीरने फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिल्याचा आरोप गौतम गंभीर यांच्याकडून करण्यात आला होता. याविषयी गौतम गंभीरनं दिल्ली पोलीसात मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली आहे.

जीवे मारण्याची धमकी आल्यापासून गौतम गंभीरच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली. याविषयी अधिक तपासही सुरु होता. ही जीवे मारण्याची धमकी पाकिस्तानातून आली असल्याचं समोर आलं होतं. इसिस काश्मीरनं फोन आणि ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी आली होती. मात्र ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी अ‍ॅड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे.

दरम्यान, गौतम गंभीरच्या तक्रारीनुसार त्याला आयएसआयएसकडून (ISIS) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘काल तुला मारायचे होते, वाचलास, काश्मीरपासून दूर राहा’, असा ईमेल गौतमला आला होता.

थोडक्यात बातम्या – 

नवाब मलिकांना मोठा दणका! मुंबई उच्च न्यायालयाने दिली ‘ही’ सूचना

‘या’ जिल्ह्यांनी देशाची चिंता वाढवली; कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर

“या सर्वांना जबाबदार कोण? मोदी सरकार पूर्ण नापास”; भाजप खासदाराचे खडे बोल

“एकेरी उल्लेख करता, तुमचं कर्तृत्व काय?”, संजय राऊतांनी घेतला पडळकरांचा समाचार

आझाद मैदानातील आंदोलनातून भाजपचा काढता पाय; सदाभाऊ म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More