बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

7 महिन्याच्या बाळाला आईनेच केली जबर मारहाण; कारण अत्यंत धक्कादायक

नागपूर | नागपूरात एक अतिशय धक्कादायक आणि मातृत्वाला लाजवणारी घटना घडली आहे. सासू-सुनेचं भांडण घरात काही नवीन नाही मात्र हेच भांडण एका चिमुकल्याच्या जीवावर बेतणारं होतं. जन्मदात्या आईनेच रागाच्या भरात 7 महिन्याच्या बाळाला जबर मारहाण केली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील अंबाझरी परिसरातील ही घटना आहे. किरण मसराम असं 7 महिन्याच्या बाळाला मारहाण करणाऱ्या आरोपी माहिलेचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. त्यात ही महिला आपल्या सासूसोबत घरगुती वादातून भांडत करत असल्याचं समोर आलं आहे.

राग अनावर झाल्यामुळे आईनेच काही महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या आपल्या पोटच्या बाळाला मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. संबधीत प्रकरणाची नागपूर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत महिलेकडून सर्वात आधी बाळाला ताब्यात घेऊन सुरक्षित केलं आहे. त्यानंतर पोलीस आणि एनजीओच्या मदतीनं या महिलेचं समुपदेशन करण्यात आलं आहे. या प्रकरणी संबधीत महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

सकारात्मक बातमी: वय 92, HRCT स्कोअर 12, त्यात मूत्रपिंडाला सूज; तरीही कोरोनावर मात!

“…तर आज देशात एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता”

‘पक्षीय अजेंडा आवरून ही देशाला सावरण्याची वेळ’; रोहित पवारांचा मोदी सरकारला सल्ला

‘मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कुच करा’; खासदार संभाजीराजेंचा कार्यकर्त्यांना आदेश

“मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More