Top News महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! प्रेयसीवर हल्ला करत स्वत:च्या तोंडात फोडला सुतळी बॉम्ब

मुंबई | प्रियकराने प्रेयसीवर हल्ला करुन त्यानंतर स्वत:ला संपवण्यासाठी तोंडात सुतळी बॉम्ब ठेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मालाड परिसरात घडली आहे.

या घटनेची माहिती कळताच कुरार पोलीस घटनास्थळी पोहचले. या दुर्घटनेत जखमी अवस्थेतील त्या दोघांनाही पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जखमी महिला मालाड परिसरात राहत असून तिचे एकासोबत प्रेम संबंध होते. तो महिलेच्या घरी नेहमी ये-जा करायचा. रविवारी तो त्या महिलेला भेटण्यासाठी आला.

त्यावेळी त्याने येताना सोबत चाकू आणि सुतळी बॉम्ब आणला होता. त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरुन वाद झाला. त्यानंतर त्याने त्या महिलेवर चाकूने वार केला व स्वत:ला संपवण्यासाठी तोंडात सुतळी बॉम्ब फोडला.

महत्वाच्या बातम्या-

पुढच्या लिलावात चेन्नईने महेंद्रसिंग धोनीला सोडून द्यावं; माजी खेळाडूचं मत

“महाराष्ट्र पोलिसांची माफी मागा अन्यथा तुमचे सर्व धंदे बाहेर काढू”

शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द नाही तर…- एकनाथ खडसे

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन!

धक्कादायक! भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख सुभाष अग्रवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या