बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! हेलिकॉप्टर अपघातग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा Accident

सुलूर | देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालं. या अपघातानंतर आता देशातील सुरक्षा यंत्रणांच्या देखील झोपा उडाल्या आहेत. अशातच आता हेलिकॉप्टर अपघातग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात (Ambulance Accident) झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या 11 जणांचे अवशेष घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा आज दुपारी कोईम्बतूरमधील सुलूर येथे वाहन चालवत असताना किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

रुग्णवाहिकेचा हा ताफा कुन्नूरजवळील वेलिंग्टन येथून सुलूर हवाई दलाच्या तळावर मृतदेह घेऊन जात होता. मात्र, या ताफ्यातील एका रुग्णवाहिकेचे संतुलन बिघडलं आणि ती अनियंत्रित होऊन एका लहानच्या टेकडीला जाऊन धडकली. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, तेथून मृतदेह दिल्लीला नेण्यात येणार होते. त्यावेळी कोईम्बतूरजवळ एका रुग्णवाहिकेचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मृतदेह दुसऱ्या रुग्णवाहिकेत हलवण्यात आलं. हा अपघात किरकोळ असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाची असल्याचं सांगितलं जातंय.

थोडक्यात बातम्या-

CDS जनरल बिपीन रावत यांच्या अपघाताचं नेमकं कारण येणार समोर?

“अतिशय सुरक्षित असलेल्या चॉपरचा अपघात कसा झाला?, याची चौकशी केली जावी”

लसीच्या डोसची ऑर्डर मिळत नसल्यानं अदर पुनावांलांनी घेतला म्हत्त्वाच्या निर्णय!

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

‘अपघात नेमका कसा घडला?’, राजनाथ सिंगांनी लोकसभेत संपूर्ण घटनाक्रम सांगितला

…अन् बिपीन रावत यांच्या आयुष्याचा शेवटही डिसेंबरमध्येच झाला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More