बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पत्नीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने पतीने केलं माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य

नवी दिल्ली | सध्या देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. अशातच लसीकरण देखील सुरु करण्यात आलं आहे. मात्र रुग्णांसाठी बेड्स आणि रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. एवढच नाही तर प्रचंड प्रमाणात ऑक्सिजनचा देखील तुटवडा भासू लागला आहे. या कारणामुळे प्रत्येक जण कोरोनाबाधित झालेल्या आपल्या माणसांना वाचवण्यासाठी जीवाच्या आकंताने प्रयत्न करत आहे. मात्र आपल्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पतीने केलेल्या कृत्यामुळे संपुर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

संबंधित घटना ही बिहारमधील आहे. येथील एका जोडप्यातील पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. पत्नीचा पाॅझिटिव्ह रिपोर्ट येताच पतीने आपल्या पत्नीचं शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढच नाही तर आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर आपल्या सोसायटीच्या टेरेसवर जाऊन संबंधित आरोपीने तिथून उडी मारत आत्महत्या केली.

संबंधित आरोपीचं नाव अतुल लाल असं आहे तर मृत पत्नीचं नाव तुलिका असं आहे. आरोपी हा रेल्वेमध्ये कामाला आहे. संबंधित दोघेही उच्च शिक्षीत हेते.  टेरेसवरुन उडी मारल्यानंतर अतुल यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेदरम्यान त्यांची मुलं आपल्या खोलीत झोपले होते. संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, एकीकडे कोरोना बाधितांचे नातेवाईक आपली माणसं वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे या घटनेने सर्वांनाच हैराण केलं आहे. तसेच पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“भारतात कोरोना मृतांची संख्या लपवली जात आहे, खरा आकडा 4 ते 5 पट अधिक”

यांच्यापेक्षा गिधाड बरी! वॉर्डबॉयनं मृताच्या बोटाचे ठसे वापरून केलं हे धक्कादायक कृत्य

ठाण्यातील खासगी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; जितेंद्र आव्हाडांचे चौकशीचे आदेश

…म्हणून पतीने आपल्या पत्नीची प्रियकरासोबतच बांधली लगीनगाठ!

“लसींच्या दराबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री गप्प का आहेत?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More