बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! थुंकी लावून रोटी करायचा, समोर आला किळसवाणा प्रकार, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सरकारने केलं आहे. तर अनेक ठिकाणी मास्कचा वापर करणं अनिवार्य असून लग्नांमध्ये लोकांच्या संख्येत मर्यादा घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात असताना दिल्लीतील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

एक व्यक्ती रोटी बनवत असून त्यावर थुंकत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ‘स्ट्रिट फूड्स’ स्वस्तात आणि चांगले मिळतात म्हणून आपण ते आवडीने खायला जातो. पण ते कोणत्या पद्धतीने बनवतात कुठे बनवले जातात याची माहिती असायला हवी. कारण गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ हे घाणेरड्या जागी तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच हा प्रकार दिल्लीत उघडकीस आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन व्यक्ती रोटी बनवण्यासाठी उभे आहेत. त्यामधील एक व्यक्ती दुसऱ्याला रोटी बनवण्यासाठी गोळे करुन देत असून दुसरा त्याची रोटी बनवताना दिसत आहे. पण रोटी बनवून झाल्यानंतर ती भाजण्यासाठी ठेवण्यापूर्वी तो व्यक्ती त्यावर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी त्या दोघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी मेरठ येथील लग्नामध्ये एक आचारी चपात्या तयार करीत असताना त्यावर थुंकत असल्याचं दिसून चित्र समोर आलं होतं. तो व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट करण्यात आला असून त्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या – 

तुम्ही अधिकारी खंडणी वसूल करण्यासाठी नेमले आहेत का?- राम कदम

महिलासंदर्भात वागताना, बोलताना… सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश-वकिलांना महत्त्वाचा सल्ला

‘काहीजण वडिलोपार्जित संपत्ती विकून घरखर्च भागत असेल तर हे…’; रोहित पवारांची मोदींवर टीका

‘या’ कारणामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने आगामी टी ट्वेन्टी सिरीज न खेळण्याचा घेतला निर्णय!

मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला, म्हणाल्या…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More