बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! चिप्सवरुन झालेल्या भांडणात पतीने पत्नीचे तुकडे करुन फेकलं कचऱ्यात

नवी दिल्ली | संसार म्हणलं की भांड्याला भांड हे लागतच. मात्र आजकाल या किरकोळ वादातून मोठमोठ्या घटना घडत असल्याचं दिसून येत. चिप्सच्या पॉकेटवरुन एका पतीने त्याच्या पत्नीचे तुकडे करुन कचऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आरोपीचं नाव थाॅमस मॅकेन असून त्याच वय 49 वर्ष आहे. तसेच खून केलेल्या पत्नीचं नाव वाॅन असून तिच वय 42 वर्ष होत. ही घटना इग्लंडमधील मॅनचेस्टरच्या स्टाॅरपोर्टमधील आहे. चिप्सच्या पॅकेटवरुन भांडण झाल्यामुळे थाॅमसने वाॅनची हत्त्या केली. एवढचं नाही तर नंतर तिचे तुकडे करुन 8 पॅकेटचा वापर करुन कचऱ्यात फेकलं.

हत्त्येनंतर थाॅमसने त्याच्या पत्नीचा फोन त्याच्या जवळच ठेवला आणि सगळ्यांना ती जिंवत असल्याचा भास करुन दिला. मात्र मुलाने एका पार्टीसाठी आमंत्रित केल्यानंतर वडिलांकडे फोन पाहून मुलाला संशय आला. यावर वाॅनचं बाहेर संबंध होते आणि त्यासोबत ती पळून गेली असल्याचं थाॅमसने सांगितल.

दरम्यान, थाॅमसने त्याचा गुन्हा स्वीकारला आहे. तपासानंतर वाॅनची अर्धीच बाॅडी सापडली आहे. तसेच थाॅमस आणि वाॅन दोघे लहानपणीचे मित्र असून त्यांच्या वयाच्या 24व्या वर्षी दोघांनी लग्न केलं होत. मात्र वाॅनचे बाहेर दुसऱ्या सोबत प्रेमसंबंध असल्याचं थाॅमसने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

रिक्षा आणि कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणं हा पर्याय नाही- प्रफुल्ल पटेल

“संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात”

जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने देवेंद्र फडणवीस आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार???

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More