बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचा वाद टोकाला, तरुणाची दगडाने ठेचून केली हत्या

नांदेड | ग्रामपंचायत निवडणुकीतील वादावरुन नांदेडच्या देगलूर तालुक्यात 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दहा जणांविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

योगेश विश्वनाथ धर्माची असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाचा प्रचार केल्याचा राग मनात धरून योगेशची हत्या करण्यात आली आहे. योगेशची रॉड व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सदर तरुण ट्रॅक्टरने शेतातील कामे आटोपून गावाकडे परतत असताना, आरोपीने योगेशला ट्रॅक्टरच्या खाली उतरण्यास सांगितले.

आरोपी योगेशला बोला तू आमच्याविरुद्ध गेलास आणि आम्हाला मतदान केले नाहीस, असं म्हणत विटा व लोखंडी रॉडने त्याला डोक्यात जबर मारहाण करण्यात आली. यात योगेश जागीच ठार झाला. योगेश याचा खून निवडणुकीच्या वादातूनच झाल्याची माहिती योगेशच्या वडिलांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्याभरात खळबळ उडाली असून बल्लूर गावास छावणीचे रूप आलं आहे. गावातील वातावरण बिघडू नये यासाठी देगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरील घटनेचा पंचनामा करून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

काय सांगता! वय वर्ष 41 मात्र तरीही ‘ही’ अभिनेत्री दिसते इतकी हॉट, पाहा फोटो!

परमबीरसिंग यांचा धक्कादायक खुलासा; मेल आयडीबद्दल म्हणाले…

राज्यात सत्ताबदल होणार?; उदयनराजेंना ‘या’ शिवसेना नेत्यानं वापरलेल्या वाक्यानं चर्चांना उधाण

एका पोलीस अधिकाऱ्याला 100 कोटीचं लक्ष्य मग अख्ख्या राज्य सरकारसमोरील लक्ष्य किती असेल- पूनम महाजन

“फडणवीसांच्या मोदी-शहा भेटीनंतर सिंह यांनी पत्र दिलं म्हणूनच संशय येतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More