‘तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल’; एकतर्फी प्रेमातून युवकाची तरूणीकडे शरीरसुखाची मागणी
पुणे | पुण्यातील एका युवकाने एकतर्फी प्रेमातून तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपीचं नाव कुतुबुद्दीन हबीब काचवाला असं आहे. कुतुबुद्दीन याला एका तरुणीवर अनेक वर्षांपासून प्रेम आहे. यातूनच त्याने तरुणीला आपल्या जवळ येण्यासाठी नकार दिला तर तिच्या पालकांना जीवे मारण्यात येईल अशी धमकी दिली.
संबंधित तरुणी ही अवघ्या 21 वर्षांची आहे. तरुणी आणि आरोपी हे 2016 साली एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. तेव्हा पासूनच आरोपीचं तरुणीवर एक तर्फीप्रेम आहे. मात्र तरुणीने प्रेसंबंधांमध्ये राहण्यास नकार दिला होता. त्यानंतर आरोपीने अनेक वेळा धमकी दिली. यादरम्यान आरोपीने धमकी देऊन तरुणीकडून एक सोन्याची साखळी आणि 40 हजार रुपये अशी एकूण 85 हजार रुपयांची वसूल केली होती.
आरोपीने तरुणीला आपल्याशीच लग्न करायचं असं सांगून जर दुसऱ्या कोणासोबत लग्न केलं तर त्या मुलासोबत तरुणीच्या पालकांना देखील ठार मारण्यात येईल अशी धमकी दिली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवली आहे.
दरम्यान, आपल्या पालकांना ठार मारण्याची धमकी देऊन आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली असल्याचा आरोप तरुणीने केला आहे. त्यानंतर आरोपी कुतुबुद्दीन याला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे.
थोडक्यात बातम्या-
उजनीचं पाणी पेटलं! “एक थेंबही पाणी देणार नाही, अन्याय झाला तर राजीनामा देईल”
ईडी अधिकारी असल्याची बतावणी करत बाजार समिती संचालकांकडे मागितली खंडणी
येत्या 3 दिवसांत ‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा इशारा
इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघ करणार ‘या’ देशाचा दौरा; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने केला खुलासा
कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करायला गेले 100 जण, 21 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ
Comments are closed.