बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना निगेटिव्ह असतांना दिला कोरोना पाॅझिटिव्हचा रिपोर्ट, अन् जिवंतपणीच केलं मृत घोषित

यवतमाळ | यवतमाळमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळमधील वसंतराव शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रूग्णाला जिवंतपणी मृत घोषित केल्याची खळबळजनक बाब काल रात्री समोर आली आहे. बातमी कळताच रुग्णाच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तर संबंधित रुग्ण हा ऑक्सिजन लावून उपचार घेत असल्याचं समोर आलं. या प्रकारामुळे काही काळ तणावाचं वातावरण तयार झालं होतं. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांनी आज या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार वजा निवेदन दिलं आहे.

बाबुळगाव तालुक्यातील दिघी पुनर्वसन येथील देवेंद्र कावणकर यांचे वडील ज्ञानेश्वर कावणकर यांना आजारपणामुळे 30 मार्चला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. निमोनियाची लक्षणे आणि ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची कोरोना चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांच्यावर काल सकाळपर्यंत त्याच वाॅर्डात उपचार चालू होते. मात्र प्रकृती ठिक नसल्यानं डॉक्टरांनी कोरोना चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांना कोव्हिड वार्डात दाखल केलं होतं. उपचार सुरु असतानाच 31 मार्चला रात्री 12 च्या सुमारास वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या कोव्हिड वॉर्डातून देवेंद्र कावणकर यांना फोन करण्याता आला. तुमच्या वडिलांच्या हृदयाचे ठोके वाढले असून प्रकृती गंभीर झाली आहे.

वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची गोष्ट कानी पडताच देवेंद्र यांनी तात्काळ 30 किलोमीटर अंतर पार करून यवतमाळ गाठलं आणि थेट कोव्हिड वॉर्डात जाऊन विचारपूस केली. तेव्हा एका महिला कर्मचाऱ्यानं तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र हे मृत वडिलांचे शरीर पाहण्यासाठी गेले तर त्यांचे वडील ऑक्सिजन लावून बेडवर उपचार घेत असल्याचं आढळून आलं. या प्रकारानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. मात्र, या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा पुढे आला असून यापूर्वी देखील असा प्रकार झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, संबंधित रूग्णाचे 10 ते 12 तास कोव्हिड वॉर्डत उपचार चालू होते. त्यानंतर 1 एप्रिलला सकाळी संबंधित रुग्णाचा कोरोना अहवाल देखील निगेटिव्ह आला. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील ‘हा’ साखर कारखाना रोहित पवारांच्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पुढील सात दिवस ‘या’ सेवा राहणार बंद

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

चोरीनंतर झालं असं काही की… चोराला अत्यानंदानेच आला हृदयविकाराचा झटका 

पुण्यात कोरोनाचा डेंजर प्रसार सुरु, पाहा गेल्या 7 दिवसांची धक्कादायक आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More