पुणे हादरलं! महिला पोलिसाचा धक्कादायक कारनामा

Murder

Pune News | पुणे पोलीस दलात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील महिला पोलिसाने केलेला कारनामा ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या महिला पोलीसने मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह करत आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलंय.

पुणे पोलीस दलात धक्कादायक प्रकार

शारिरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवे मारण्यात येईल. मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडासोबत ओळख आहे, असं म्हणत या महिला पोलीसने मित्राच्या पत्नीला धमकवलं. या प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी कारवाई करत त्या महिला पोलिसाचे निलंबन केलं आहे. अनघा ढवळ असं आरोपी महिला पोलिसाचं नाव आहे.

पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अनघा ढवळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Pune News | “तुझ्या घरच्या लोकांना ठार करु”

पुणे पोलीस दलातील कोथरुड वाहतूक पोलीस शाखेत अनघा सुनील ढवळे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तिने तिच्या मित्राच्या पत्नीवर परपुरुषाबरोबर संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. जर तू परपुरषाबरोबर शारीरीक संबंध ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार करु, अशी धमकी दिली.

आम्ही एक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट मनी करतो. त्यात 9 कोटींचा व्यवहार झाला आहे. त्यातील तुझ्या नवऱ्याला 40 ते 50 लाख रुपये मिळणार आहेत, असं अनघा ढवळेने त्या पीडित महिलेस सांगितल्याचं समजतंय.

पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्याने हा प्रकार केल्यामुळे पोलीस दलात काय सुरु आहे? जर पोलीस धमक्या देऊ लागले तर सर्वसामान्यांचे काय होणार? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.

 महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांनो गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘हे’ 17 रस्ते राहतील बंद, पर्यायी मार्ग कोणते?

कीर्तन कार्यक्रमावरून घरी परतत असतानाच काळाचा घाला, धुळ्यात 4 जण जागीच ठार

सोनं पुन्हा रेकॉर्ड मोडणार?, एकाच दिवसात झाली तब्बल ‘इतक्या’ हजारांची दरवाढ

“विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर होती, पण..”; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

सर्वसामान्यांना झटका! खाद्य तेलाच्या दरात झाली मोठी वाढ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .