Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात धक्कादायक घटना!; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार

पुणे | पुण्यात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. खराडी परिसरातली एक धक्कादायक घटना नुकतीच उजेडात आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

20 वर्षांची एक तरुणी खराडीतल्या कॉल सेंटरमध्ये काम करते. ती कामावरून घरी परत येत असताना तरुणाने तिची गाडी भर रस्त्यात अडवली. तिला मारहाण केली आणि निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली. ही तरुणी खराडीच्या कॉल सेंटरमध्ये काम करते. लांबलेली शिफ्ट संपवून ती पहाटे तीन वाजता आपल्या दुचाकीवरून धानोरी इथे आपल्या घराकडे निघाली होती. त्या वेळी दुसऱ्या मोटारसायकलवरून आलेल्या एका युवकाने तिला अडवलं. रस्त्यावर कोणी नाही याचा गैरफायदा घेत तिच्यावर जबरदस्ती केली. तिला मारहाण करत आपल्या बाइकवर बसवलं आणि खराडीजवळ निर्मनुष्य भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती आहे.

या तरुणीने अज्ञात तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोना लसीमुळे तुम्ही नपुंसक देखील होऊ शकता’; या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

‘…नाही तर मी राजीनामा देईल’; सुजय विखे पाटील भडकले

‘नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाही तर…’; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही- जयंत पाटील

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या