बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना झाला, दिवसभर फिरुनही बेड मिळाला नाही; पुण्यातील महिलेची आत्महत्या

पुणे | महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या संसर्गानं थैमान घातलं आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांवर ताण येताना दिसत आहे. तर राज्यभरात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. पुण्यासाख्या शहरात कोरोना रूग्णांना बेड्स देखील मिळत नाहीत. यातच आता पुण्यातल्या वारजे भागात एका महिलेने बेड न मिळाल्यानं गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वारजे भागात एका महिलेला कोरोना झाला होता. तिला खूप त्रास होऊ लागल्याने तिनं सोमवारी पतीसोबत दिवसभर शहरातील अनेक रूग्णालयात जाऊन बेड मिळण्यासाठी प्रयत्न केला. मात्र काही केल्यानं त्यांना बेड मिळाला नाही. त्याच दरम्यान तिला खूप त्रास होऊ लागला. त्यात या महिलेला दुसरा आजार देखील होता त्यामुळे ती खूप अस्वस्थ झाली. सोमवारी रात्री जेवण झाल्यावर ती बेडरूममध्ये गेली.

पण सकाळी बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या पतीने आत जाऊन पाहिले. त्यावेळी तिने गळफास घेतल्याचं दिसून आलं. महिलेला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर पोलिसांनी रूमची पाहणी केली. यावेळी संबधित महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे.

दरम्यान, या सुसाईड नोटमध्ये मी आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं त्या महिलेनं म्हटलं आहे. पुढे सुसाईड नोट आधारे तपास सुरू असल्याचे वारजे पोलिसांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

करण जोहरनं कार्तिक आर्यनला सिनेमातून काढलं, यापुढेही काम देणार नाही?

पत्नीचं दुसऱ्याशी अफेअर, पती ढसाढसा रडला अन् उचललं धक्कादायक पाऊल

कोरोना काळात ‘गरिबांचा मसीहा’ बनलेल्या सोनू सूदलाही कोरोनाची लागण

“कोरोनाची दुसरी लाट जितक्या वेगानं आली, तितक्याच वेगानं जाणार”

काळजाचा ठोका चुकवणारी घटना; मांत्रिकाकडे जाऊन उपचार घेणं कोरोनाबाधित महिलेच्या जीवावर बेतलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More