बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माणुसकीला काळीमा फासणारी घटना, पोटच्या मुलीवर बापाचे अत्याचार

ठाणे | देशात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या (Womens Molestation) घटना वाढत असतानाच ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील (Thane District)  शहापूर (Shahapur) तालुक्यात एका बापाने चक्क पोटच्या मुलीवरच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर हा सारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपीला दोन मुली असून त्यातील एकीचं वय 13 वर्ष आहे तर दुसरीचं वय 6 वर्ष आहे. आरोपी आणि त्याची पत्नीचं बऱ्याचं दिवसांपासून पटत नसल्याने वेगळे राहत होते. आरोपी जानेवारी महिन्यांपासून मेंगाळपाडा येथे तर त्याची पत्नी भगतपाडा येथे राहत होती. त्यामुळे मोठी मुलगी पित्यासोबत राहत होती तर लहान मुलगी आईसोबत भगतपाडा येथे राहत होती.

या दरम्यान आरोपी नराधम पिता गेल्या 7 महिन्यांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवतीदेखील राहिली होती. काही दिवसांनतर आपोआपच पिडीतेच्या पोटातील गर्भाचा मृत्यू झाला. आरोपीला हा प्रकार समजताच त्याने गर्भाची विल्हेवाट लावली. त्यामुळे हे प्रकरण दबून राहिले.

आरोपीने पुरावे नष्ट करूनही पिडीतेच्या आईला याबद्दल समजलं. त्यानंतर पिडीतेच्या आईने मुलीला जवळ घेऊन याबाबत विचारले. तेव्हा मुलीने घाबरलेल्या अवस्थेत सारा प्रकार सांगितला. मुलीच्या आईला सर्व प्रकरण समजताच तिने तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दिली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

थोडक्यात बातम्या-

नवाब मलिकांना मोठा दणका! मुंबई उच्च न्यायालयाने दिली ‘ही’ सूचना

‘या’ जिल्ह्यांनी देशाची चिंता वाढवली; कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर

“या सर्वांना जबाबदार कोण? मोदी सरकार पूर्ण नापास”; भाजप खासदाराचे खडे बोल

“एकेरी उल्लेख करता, तुमचं कर्तृत्व काय?”, संजय राऊतांनी घेतला पडळकरांचा समाचार

आझाद मैदानातील आंदोलनातून भाजपचा काढता पाय; सदाभाऊ म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More