बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाशिकमध्ये छातीत दुखून अचानक होणाऱ्या मृत्यूंबाबत संभ्रम कायम 2 दिवसांत चक्क 5 जणांचा मृत्यू 

नाशिक | कोरोनाचं संकट घोंगावत असतानाच नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक आजार डोकं वर काढत आहे. काही दिवसांपूर्वी चक्कर येऊन मृत्यू होण्याच्या घटना ताज्या असतानाच आता छातीत दुखू लागल्यानं नाशिकमध्ये बळी जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत अचानक छातीत दुखू लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला आहे. अचानक होणाऱ्या मृत्यूंबाबत संभ्रम कायम आहे.

अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्यानं 20 एप्रिलला एका दिवसात 11 जण मृत्युमुखी पडले होते. त्याआधीच्या आठवड्यात 13 जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाला होता. 15 एप्रिल रोजी एका दिवसात 9 जणांना चक्कर येऊन प्राण गमवावे लागले होते, तर त्याआधी चौघे मृत्युमुखी पडले होते. म्हणजेच दोन आठवड्यात 24 जणांचा चक्कर येऊन मृत्यू झाला होता. महत्वाचं म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती.

याआधीही चक्कर येऊन अचानक छातीत दुखू लागल्यानं नाशिकमध्ये अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्यानं प्रशासनापुढं नवं संकट उभं राहिलं आहे. मागील काही दिवसात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळं उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

दरम्यान, या नव्या प्रकारामुळं वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चक्कर येणं, मळमळ होणं यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला नाशिक शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतानाही काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

“मन की बात आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाही, सगळंच रामभरोसे”

धक्कादायक! कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची ‘या’ कारणामूळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दोघांना विजेच्या खांबाला बांधलं अन्…

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला पत्नीशी घटस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More