बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मन हदरवून टाकणारी घटना, एकाच वेळी कुटुंबातील सगळ्यांचे मृतदेह सापडले एकाच घरात

नवी दिल्ली | दिल्लीच्या रोहिणी परिसरात मनाला हदरवून टाकणारी घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. एकाच कुटुंबातील सगळ्यांचेच मृतदेह एकाच वेळी सापडले असल्याने संपुर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेमध्ये कुटुंबातील मुख्य व्यक्ती त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. मात्र घटनास्थळीचं चित्र पाहिल्यानंतर ही घटना हत्या आहे, की आत्महत्या असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ह्या संपुर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा उघडताच सर्वांना मोठा धक्का बसला. दरवाजा उघडताच कुटुंबातील सर्वांचे मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडले होते. मात्र परिवारातील मुख्य धीरज यादव हा फासावर लटकलेल्या अवस्थेत होता.

घटनास्थळी आढळलेल्या धीरजच्या फासावरुन त्यानेच सर्वांचा खून करुन नंतर फाशी घेतली असल्याचा अंदाज सध्या लावण्यात आला आहे. धीरज हा 31 वर्षांचा असून त्याची पत्नी आरती ही 28 वर्षांची होती. या दोघांचे असलेले दोन मुलं हितेन हा 5 वर्षांचा तर अथर्व हा केवळ 3 वर्षांचा होता. आता या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी एकाच कुटुंबातील ४ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. परिवाराला मोठ्या प्रमाणात गरिबी आल्याकारणाने त्या कुटुंबानी आत्महत्या केली असल्याचं समोर आलं होत.

थोडक्यात बातम्या-

राजेश टोपे यांचं महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात मोठं वक्तव्य; वाचा सविस्तर

निवडणुकीच्या प्रचारात भाजपने केली ‘ही’ घोडचूक; चूक समजताच व्हिडीओ हटवला

‘त्या’ 27 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई?; विभागीय आयुक्तांचा निर्णय, महाजनांचा जीव टांगणीला!

परिणिती चोप्राचा टाॅपलेस बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले…

“भाजपने संपूर्ण ताकद लावली तरी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More