बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, ‘या’ वयोगटात कोरोना रुग्णांची धक्कादायक वाढ

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसागणिक झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असताना आता एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. 10 ते 20 वर्ष वयोगटातील तरूण वर्गाला या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचं डॉ.तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे.

पहिल्या कोरोनापेक्षा आताचा कोरोना जास्त घातक असल्याचंही तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केलं तसेच, राज्यात आता लाॅकडाऊन संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही, पण येत्या काळात सरकारकडुन कडक निर्बंंध लागु केले जातील. असंही त्यांनी सांगितलं. पण नागरिकांनीही नियमांचं पालन करणं गरजेचं असून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

मागच्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनमुळे वयोवृद्ध लोकांना मोठा धोका निर्माण झाला होता. पण आताच्या नव्या स्ट्रेनमुळे 20 ते 40 या वयोगटातील रुग्णसंख्या अधिक असल्याचं तात्याराव लहानेंनी सांगितलं. तसंच आता महाराष्ट्रात 10 वर्षांवरील मुलांना कोरोनाची लागण होत असल्याने पालकांच्या चिंतेत वाढ होत असताना पाहायला मिळत आहे.

तात्याराव लहाने यांनी  पालकांना घाबरून न जाता मुलांची घरीच योग्य ती काळजी घेऊन त्यांचा कोरोनापासुन बचाव करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांनी जर नियमांचं पालन केलं नाही तर, सरकारकडे फक्त लाॅकडाऊन हा एकच पर्याय राहतो असंही त्यांनी या माध्यमातुन सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग; आरोग्य यंत्रणेची कबुली

2 दिवसांत चक्क 4 टन आंब्याची आगाऊ नोंदणी; शेतकरी डॉ. केशव सरगर यांनी लढवली ‘ही’ शक्कल

मन हदरवून टाकणारी घटना, एकाच वेळी कुटुंबातील सगळ्यांचे मृतदेह सापडले एकाच घरात

अनुष्का शर्माच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे शुटींगवर परतल्यानंतर ती होतेय ट्रोल

राजेश टोपे यांचं महाराष्ट्रातील लाॅकडाऊन संदर्भात मोठं वक्तव्य; वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More