बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक ! मुंबईच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. त्यातच आता मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं दिसत आहे.

मुंबईत आज दिवसभरात 496 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 237 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 2 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,46,346 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 3815 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 15993 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,24,040 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागिरकांना दक्षता घ्यायली हवी.

थोडक्यात बातम्या- 

राजू शेट्टी यांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ प्रस्ताव

‘शरद पवारांवर आता फक्त पुस्तक यायचं बाकी आहे’; चंद्रकांत पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

“राणी बागेतील ‘पेंग्विन’ म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी”

‘भारताला महासत्ता बनायचं असेल तर…’; नितीन गडकरींनी दिला मोलाचा सल्ला

‘देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला तालिबान जबाबदार’; भाजप आमदाराचा अजब दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More