बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! आता कोरोनापेक्षाही धोकादायक ‘या’ विषाणूचा शिरकाव

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या बदलत्या विषाणूमुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी या नवनवीन विषाणूमुळं तिसऱ्या लाटेचे धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता आणखी एका नव्या विषाणूनं डोकं वर काढल्याचं समोर येत आहे.

नवीन आढळलेल्या विषाणूचं नाव ‘मारबर्ग’ असल्याचं समोर येत आहे. हा विषाणू पश्चिम आफ्रिकेतील गीनीमध्ये आढळून आला आहे. मारबर्ग या विषाणूचा पहिला रुग्णही आढळून आल्याचं समोर आलं आहे. हा एक संसर्गजन्य विषाणू असून याचा फैलाव प्राण्यांमधून माणसांमध्ये होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मारबर्ग या विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानं गिनीमधील लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मारबर्ग हा विषाणू इबोला कोरोनापेक्षाही घातक असल्याचं म्हटलं जात आहे. या विषाणूचा संसर्ग वटवाघळांच्या माध्यमातून होत असल्याचं, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओनं सांगितलं.

दरम्यान, वाढत्या संसर्गाचा धोका लक्षात घेता योग्य ती उपाययोजना करण्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. वेगवेगळ्या गिनी सरकारनंही यासंदर्भात एक पत्रक काढून मारबर्गचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका, उमेदवारांचं गुन्हेगारी रेकाॅर्ड प्रसिध्द करण्याचा अवधी अवघा…

सुखद धक्का! नीरज चोप्राच्या सन्मानार्थ घेण्यात आला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

भाजपकडे ‘इतक्या’ हजार कोटींचं उत्पन्न; एका वर्षात तब्बल 50 टक्क्यांची वाढ

ठेवीदारांना मोठा दिलासा; ‘एफडी’शी संबंधित विधेयक संसदेत मंजूर

‘बिग बाॅस 14’ ची विजेती रुबीना दिलैक लवकरच करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More