बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रशियन सैनिकांची विकृत मानसिकता; धक्कादायक माहिती समोर

कीव | रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) 40 दिवसांपेक्षाही जास्त कालावधी उलटला असला तरीही हे युद्ध संपायचं नाव घेत नाहीये. युक्रेनमधील (Ukraine) परिस्थिती भयावह असताना रशियन सैनिक युक्रेनियन नागरिकांच्या जाणीवपूर्वक हत्या करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

या घटनेवरून रशियावर (Russia) चौफेर टीका होत असताना रशियन सैनिकांची विकृत मानसिकता आणखी एकदा समोर आली आहे. रशियन सैनिक युक्रेनमधील तरूणींवर आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

रशियन सैनिक बलात्कार करून तरूणींना, अल्पवयीन मुलींना जीवे मारत आहेत. त्यांच्या शरीरावर स्वस्तिकाच्या आकाराच्या भाजल्याच्या खुणा दिसून आल्या असल्याची माहिती युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेंक (Lesia Vasylenko) यांनी ट्विट करत दिली आहे. या ट्विटसोबत त्यांनी काही फोटो देखील शेअर केले आहेत.

दरम्यान, रशियन सैनिक लुटतात, बलात्कार करतात, आणि मारून टाकतात, असा धक्कादायक दावा लेसिया वासिलेंक यांनी केला आहे. तर रशियाकडून सातत्याने होणाऱ्या हल्ल्यात हजारो युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे व अनेक मोठी शहरं उद्ध्वस्त झाली आहेत.

थोडक्यात बातम्या-

दोन मुलांचा पिता असलेला ‘हा’ अभिनेता आहे रश्मिकाचा क्रश, नाव वाचून तुम्हालाही बसेल धक्का

लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

जो बायडन यांनी पुतिन यांना दिला गंभीर इशारा, म्हणाले…

“कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं होतं हे सर्वांना माहिती”

तेल कंपन्यांचा सर्वसामान्यांना झटका, 13 दिवसांत पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी महागलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More