बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरबाबत धक्कादायक माहिती समोर!

Baba Siddiqui | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्विकारली आहे. बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

या हत्या प्रकरणात आता मुंबई क्राईम ब्रांचने दोन आरोपींना अटक केली होती. यामधला एक आरोपी धर्मराज राजेश कश्यप (19) हा युपीच्या बहराईचचा आहे. तर दुसरा आरोपी गुरमेल बलजीत सिंह (23) हा हरियाणाचा आहे. गुरमेलला आता 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सूनावण्यात आली आहे. या दोन आरोपींपैकी गुरमेलीची क्रिमिनल हिस्ट्री आता समोर आली आहे.

आरोपी गुरमेलचे आई-वडील लहाणपणीच मरण पावले होते. त्यामुळे गुरमेल हा लहाणपणापासून त्यांची आजी आणि धाकट्या भावासोबत राहत होता. त्यानंतर एका हत्येचा प्रकरणात तो तुरूंगात गेला होता. तूरूंगातून परतल्यानंतर आमचा त्याच्याशी संपर्कच झाला नाही, असं गुरमेलच्या आजीने सांगितलं आहे.

आरोपीची आजी फुल्ली देवी म्हणाली, खूप पूर्वी गुरमेल याला आम्ही घरातून काढून टाकले आहे. तो आमच्यासाठी मेला आहे. त्याला चौकात उभे करुन गोळ्या घाला.

गुरमेल गुन्हेगारी प्रवृत्तीचा

गुरमेल चार महिन्यांपासून गावात आला नाही. तो कुठे गेला आणि काय करतो हे आम्हाला माहीत नाही. आम्हीही त्याच्याशी संबंध तोडल्यामुळे त्याला कधी विचारणा केली नाही. आमचे त्याच्याशी काहीच नातं नाही, असंही त्या म्हणाल्यात.

2019 मध्ये गुरमेलने सुनील नावाच्या तरुणाचा खून केला होता. यानंतर त्याला अटक करून कैथल तुरुंगात पाठवण्यात आले. कैथल तुरुंगातच तो गँगस्टर लॉरेन्सच्या साथीदारांच्या संपर्कात आला.

महत्त्वाच्या बातम्या- 

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर गँगस्टर रोहित गोदाराचं वक्तव्य चर्चेत!

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील तिसरा आरोपी पुण्यात करत होता नोकरी!

‘…म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या केली’,; बिश्नोई गँगच्या खुलाशाने सगळीकडे खळबळ

बिश्नोई गँगकडून सिद्दीकींच्या हत्येचा खुलासा, ‘त्या’ पोस्टमुळे एकच खळबळ

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय!