बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनायक मेटेंच्या ड्रायव्हरबाबत धक्कादायक माहिती समोर!

मुंबई | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताबद्दल आता नवीन बाब समोर आली आहे. अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते, असा दावा मेटे यांच्या भाच्याने केला आहे.

14 तारखेला साहेबांच्या गाडीला अपघात झाला, मला पहाटे 5.30 वाजता फोन आला होता. साहेबांच्या गाडीचा अपघात झाला आहे, आपल्याला निघायचं आहे, आम्ही तसेच लगेच निघालो. साहेबांचे पीए विनोद काकडे यांचा फोन आला होता, बाळासाहेब तुम्ही लवकरात लवकर दुसऱ्या बोगद्याजवळ जा. मी त्यावेळी विचारलं ड्रायव्हर कोण आहे. साहेबांकडे तीन ड्रायव्हर आहे. मी मुंबईतील ऑफिसला फोन केला, तेव्हा कळलं की एकनाथ कदम नावाचा ड्रायव्हर आहे. मी फोन एकनाथ कदम यांना फोन केला, तर फोन उचलत नव्हता. त्यावेळी मी त्याला विचारलं तू कुठे आहे, तर तो रडत होता. मी लोकेशन विचारलं तर तो सांगत नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन चालक एकनाथ कदम यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी चालक एकनाथ कदम (Eknath kadam) याच्याबाबतही संशय व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

सुप्रिया सुळेंनी अमित शहांकडे केली ‘ही’ मागणी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकारचा मोठा निर्णय

‘…तो भाजपचा प्लॅन बी’; ‘या’ महिला नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

‘तुम्ही दोघी माझ्या आयुष्यात…’; अनुरागने शेअर केला दोन्ही Ex Wives सोबतचा फोटो

ईडीचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More