बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनू सूदवर गंभीर आरोप; Income Tax च्या छापेमारीनंतर धक्कादायक माहिती समोर

मुंबई | अभिनेता सोनू सूदचे घर आणि कार्यालयासह त्याच्याशी संबंधित 6 ठिकाणी आयकर विभागाने कारवाई केली होती. आयकर विभागाला या छाप्यात अभिनेत्याविरोधात कर चुकवल्याचे सबळ पुरावे सापडले आहेत.

सोनू सूदवर आयकर विभागाने छापे घातल्यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हटलं आहे की, त्याच्याविरोधात 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर चोरीचं प्रकरण समोर आलं आहे. सीबीडीटीने म्हटलं आहे की, अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या इतर परिसरात शोध घेताना, करचुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत.

आयकर विभागाने सोनू सूदच्या कोणत्याही ठिकाणाहून काहीही जप्त केलेले नाही. आयकर विभागाने बुधवारी अभिनेत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहिणी केली होती, कारण अभिनेत्याशी संबंधित अकाऊंट बुकमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते.

थोडक्यात बातम्या- 

“मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?”

“दिलेला शब्द मोडत नाही ही शिवसेनेची खासियत आहे”

मास्क न घातल्यामुळे महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यासोबत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामं करा- अजित पवार

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More