बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

द.आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या ‘त्या’ कोरोना रूग्णाबद्दल धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र दिसत होतं. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय वाटत असतानाच कोरोनाच्या नव्या प्रकाराने अनेक देशात धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्याने राज्यातही कडक पाऊलं उचलायला सुरूवात झाली.

एकीकडे ओमिक्रॉन व्हायरसने जगाची चिंता वाढवली असताना दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतलेला एक प्रवासी कोरोनाबाधित आढळला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हा कोरोना रूग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यात द. आफ्रिकेतून केप टाऊनहून डोंबिवलीत आलेल्या या प्रवाशाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण डोंबिवलीत राहत असून मर्चंट नेव्हित कामाला आहे. धक्कादायक म्हणजे या रूग्णाचे लसीकरण झाले नसूनही त्याने विमानाने प्रवास केला. इतकंच नाही तर हा तरूण कोरोना चाचणी न करता देशभर फिरला आहे. ओमिक्रॉनमुळे चिंता वाढली असताना या रूग्णामुळे डोंबिवलीसह राज्यातही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार हा रूग्ण नेव्हीत कामाला असल्याने सतत समुद्रात प्रवास करतो. त्यामुळे लसीकरणाबाबत त्याला कधी विचारणा झाली नाही. शिवाय त्याच्या लसीकरणातही काही अडचणी होत्या. तर सध्या हा रूग्ण महापालिकेच्या विलगीकरण कक्षात आहे.

थोडक्यात बातम्या-

‘कुछ नही होता यार’ आता अजिबात चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली धोक्याची घंटा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी जाणून घ्या एका क्लिकवर

“वीज कनेक्शन तोडले, गावची गावे अंधारात जात आहेत आणि तुम्ही लग्नात नाचता?”

“…पण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही, 2 वर्षात राज्य 20 वर्षे मागे गेलं”

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसावा म्हणून चक्क धरणातून सोडले पाणी, अधिकाऱ्यांचा प्रताप उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More