बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस न घेणं पडू शकतं महागात; धक्कादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली, तरीही चिंता अद्यापही कायम आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली. अमेरिकेत कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला, त्यांनी लस घेतलेली नव्हती किंवा लस घेण्यास नकार दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोरोना लस अनेकांसाठी संजीवनी ठरली आहे. तर ज्यांनी कोरोना लस घेतली नाही, त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाबतचा एक अहवाल जारी करण्यात आला आहे.

कोविड-19 चा संसर्ग झालेले आणि रुग्णालयात भरती असलेल्या 8.53 लाख लोकांपैकी केवळ 1200 लोकांना कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे. या सर्व लोकांनी पहिल्यांदा कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच लस घेतली होती. याचाच अर्थ लसीकरणानंतर संसर्गाचा दर केवळ 0.1 टक्के आहे.

मे महिन्यात अमेरिकेत कोरोनामुळे 18 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी लस घेऊनही मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या केवळ 150 होती. याचा अर्थ लसीकरणामुळे मृत्यूदर कमी झाला असून तो 0.8 टक्के आहे. लवकरात लवकर सर्व नागरिकांनी लस घेतल्यास हा आकडा शून्यावर येऊ शकतो, ही बाब यातून स्पष्ट झाली आहे. अमेरिकेत कोविड-19 चा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेले 98 ते 99 टक्के नागरिक असे होते की ज्यांनी लस घेतलेली नाही, असं राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाचे माजी सल्लागार अँडी स्लेविट यांनी सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

“अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!”

कोण राजे?, मी तर त्यांना राजे ही उपाधीही देत नाही- नारायण राणे

मोठी बातमी! अनिल देशमुखांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स

विमानतळ नामकरण आंदोलन भोवलं; नियमांचं उल्लंघन केल्यामुळे 20 हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल

“…अन्यथा येत्या आधिवेशात विधानसभेला घेराव घालू”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More