मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंबाबत सरकारी वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
मुंबई | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee Strike) एका गटाने 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर हिंसक आंदोलन केलं. या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे सूत्रधार म्हणून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात सदावर्तेंबद्दल धक्कादायक माहिती उघड केली आहे. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
गुणरत्न सदावर्तेंच्या घरून पोलिसांना पैसे मोजण्याचं मशिन सापडलं आहे. सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून जमा केलेले पैसे याच मशिनद्वारे मोजले असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच सदावर्तेंनी संपकाळात खरेदी केलेल्या मालमत्तांची देखील पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
दरम्यान, गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात नवीन गाडी आणि काही मालमत्ता खरेदी केल्याचं म्हटलं जात आहे. या सर्वाची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे सदावर्ते चांगलेच अडचणीत आले आहेत. सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या या गोष्टी न्यायालयासमोर मांडल्या.
थोडक्यात बातम्या-
“पक्षप्रमुख आदेश देतील आणि ईट का जवाब पत्थरसे दिया जायेगा”
महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती?, केंद्राने राज्यांना दिल्या ‘या’ सूचना
“राज ठाकरेंना फुले, शाहू, आंबेडकरांची अॅलर्जी आहे का?”
प्रशांत किशोर यांचा फाॅर्म्युला ठरला! महाविकास आघाडीबाबत काँग्रेस हायकमांडला दिला ‘हा’ सल्ला
‘राज ठाकरेंचं समर्थन भाजपला महागात पडेल’; केंद्रीय मंत्र्याचा भाजपला सल्ला
Comments are closed.