बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वानवडी बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

पुणे | पुण्यातील वानवडी बलात्कार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडीतेवर पुण्यातच नाही तर मुंबईजवळही अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. वानवडी पोलिसांनी ठाण्यातून एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील आरोपींची संख्या 17 झाली असून यातील 14 जणांनी बलात्कार केल्याचं समजतंय.

पुणे रेल्वे स्थानक परिसरातून 13 वर्षीय मुलीचं अपहरण करुन रेल्वेतील दोन कर्मचारी आणि काही रिक्षा चालकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार 5 सप्टेंबरला उघडकीस आला होता.

वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन दिवसापूर्वी दोन लॉज मॅनेजरला ताब्यात घेतलं होतं. दोन लॉज मॅनेजर धरुन एकूण आरोपींची संख्या 16 वर गेली होती. तर प्रशांत सॅमियल गायकवाड आणि राजकुमार रामनगिना प्रसाद या अटकेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेकडून निलंबित करण्यात आलं आहे.

दरम्यान, बलात्कार झाल्याचे माहिती असूनही तिला पालकांकडे न सोपवता बिहारला नेणाऱ्या तिच्या मित्रालाही अटक करण्यात आली. आता या सर्व आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“नेहरु असतानाच हिंदू मारले गेले, देवाचे आभार माना की RSSचा जन्म झाला”

…तर दर महिन्याला मिळेल दहा हजार पेन्शन; पती-पत्नीसाठी सरकारची बंपर योजना

“…तरच प्रेक्षकांना आयपीएल पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार”

“गरीब देश कोरोनाने चिरडलेत, लसीकरणासाठी त्यांना मदत करायलाच हवी”

टाइम्स मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दहशतवादी मुल्ला बरादरचा समावेश!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More