गौतमीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

मुंबई | महाराष्ट्राला सध्या जिच्या डान्सने वेड (Gautami Patil Video Viral) लावलं आहे. सोशल मीडियावर जिच्या व्हिडीओची धूम असते अशी ही गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

यावेळी गौतमी तिच्या एका न्यूड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. राज्याचा कानाकोपऱ्यात तिच्या लावणीचा फड रंगतो. अशा एका कार्यक्रमादरम्यान कोणीतरी तिचे कपडे बदलतानाचा व्हिडीओ (gautami patil news) काढला.

एवढंच नाही तर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला. गौतमी प्रसिद्धीच्या झोतात आल्यामुळे बदनाम करण्यासाठी हा कट असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका महिलेने याबाबत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला आणि सहकाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही सांगण्यात आलं आहे.

हा व्हिडीओ काहींनी फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला होता.पोलीस याबाबत आता सखोल चौकशी करीत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी टि्वट करीत या विषयावर प्रतिक्रिया दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More