बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! बापानेच केलं पोटच्या मुलीसोबत काळीमा फासणारं कृत्य, वाचून तूम्हीही व्हाल सुन्न

मुंबई | नवी मुंबईच्या उलवे येथे बापाने आपल्या पोटच्या अवघ्या 13 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी आरोपी बापाला अटक केलं आहे. आरोपीला न्यायालयनं 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपीचं नाव अरुण हंकारे असल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित मुलगी आपल्याच घरातील हॉलमध्ये एकटी बसलेली असतांना आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यावेळी पीडिता ओरडू लागल्याने त्याने तिला सोडून दिलं. पण कोणाला हा प्रकार सांगितला तर तुला  जीवे मारेन, अशी धमकी दिली. आरोपीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा कामानिमित्त ठाणे येथे राहतो. तर आरोपीच्या पत्नीचं बारा वर्षांपूर्वी निधन झालं आहे.

नराधाम बापाने पुन्हा तीन ते चार वेळा हे दुष्कृत्य केल्यानं पीडिता भयानक संतापली होती. 15 मार्चला सकाळच्यावेळी पुन्हा हा प्रकार घडल्यानं पीडितेचा बांध फुटला आणि तिने शिविगाळ करत विरोध केला. हे ऐकून स्वयंपाकघरातील तिच्या दोन्ही बहिणी बाहेर आल्या. त्यांनी विचारपूस केली असता त्यांना घडलेला प्रकार समजला. मात्र, वडिलांच्या भीतीनं तिच्या बहिणी गप्प राहिल्या. तेव्हा तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार करणार असल्याची धमकी आरोपीला दिली. त्यावर आरोपीनं घरातील लाकडी बांबूनं पीडितेला जबर मारहाण केली. त्यामुळे 21 मार्चला पीडिताने घरातून पळ काढला आणि ती नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात राहू लागली.

दरम्यान, आरोपी बापाने मुलगी हरवल्याची पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तिला फोन केला आणि फोनवर व्यस्त ठेवत नेरुळ रेल्वे स्टेशन गाठलं आणि पीडित मुलीला ताब्यात घेतलं. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेला पोलीस सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टमध्ये घेऊन गेले. ठाणे महिला आयोग कार्यालयातील समुपदेशक अधिकाऱ्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन समुपदेशन केलं. घडलेला सर्व प्रकार पीडितेने सांगितला. यावर पीडित मुलीच्या नराधम बापाला एनआरआय पोलिसांनी ताब्यात घेऊन कोठडीत ठेवलं आहे. पुढील तपास एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील करत आहेत.

थोडक्यात बातम्या

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही- रमेश चेन्निथला

निकिता तोमर हत्याकांडाचा निकाल; एकाची निर्दोष मुक्तता तर दोघांना दिली ‘ही’ शिक्षा

‘या’ कारणामुळे महापालिकेचा ड्रीम मॉलला वरदहस्त आहे का?- अतुल भातखळकर

राहुलचा शतकी तडाखा, भारताचं इंग्लंडला 337 धावांचं आव्हान

‘शिवसेनेनं UPAमध्ये यावं मग त्यांनी व्यासपीठावर आपलं मत मांडावं’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More