बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘या’ महिला सरपंचावर आली चक्क भीक मागण्याची वेळ

नवी दिल्ली | सरपंच म्हटलं की अमाप पैसा, शानदार घर, चारचाकी गाडी अशीचं प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. कदाचित या सगळ्या गोष्टींमुळेच गावात संरपचपदाच्या निवडणुकीला अधिक मान मिळतो. मात्र, ओडीशा राज्यातील (Odisha) एका महिला सरपंचाच्या बाबतीत अगदी उलटीच परिस्थिती समोर आली आहे.

ओडीसातील गंजम जिल्ह्यातील एका महिला सरंपचावर चक्क भीक मागण्याची वेळ आली आहे. हेमा नायक (Hema Nayak) असं या महिलेचं नाव आहे. बडापल्ली गावाच्या त्या सरपंच आहेत. नायक या अनुसुचित प्रवर्गातील आहेत. अनुसुचित प्रवर्गातील महिलांसाठी राखीव पद असल्याने नायक यांनी अर्ज केला होता. केवळ नायक यांनीच अर्ज केल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती.

मागील काही दिवसांपूर्वी नायक घरोघरी जाऊन भीक मागत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आली होती. मात्र, बीडीओ मिताली पात्रा यांनी हा व्हिडीओ खोटा असून या माहितीला खोट म्हटलं आहे. तरीही आम्ही याबाबत माहिती घेणार असल्याचं पात्रा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हेमा नायक या एका कार्यक्रमात आमदारासोबत व्यासपीठावर दिसल्या होत्या. मग लगेचच त्यांच्यावर ही परिस्थिती कशी आली? शिवाय हेमा नायक यांना सरपचं होऊन 4 वर्ष झाले आहेत. तरी अजून त्यांची आर्थिक परिस्थिती का सुधारली नाही? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

थोडक्यात  बातम्या-

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

MHADA पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ भाजप नेत्याला अटक

मुंबई पोलिसांच्या तपासाला ब्रेक; शाहरूख खानच्या ‘या’ पावलामुळे समीर वानखेडेंना दिलासा

TET घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट, आणखी एका बड्या अधिकाऱ्याला अटक

सोनं-चांदी दरात घसरण; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More