कोल्हापूर । अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या पतीची निर्घृण हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, घडलेली घटना वाचून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. 39 वर्षीय महीलेचं 21 वर्षाच्या तरूणा सोबत अनैतिक संबंध होते. पण आपल्या संबधांत आपला नवरा अडथळा आणू शकतो म्हणून या जोडप्याने त्याचीच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
50 वर्षीय महंमद बंडू जमादर याच्या पत्नीने प्रियकर आणि त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी त्याचीच हत्या केली आहे. महंमद बंडू जमादर पत्नी व मुलांसह कोल्हापूर जवळील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील तळंदगे फाटा इथे राहत होते. त्यांचा पट्टणकोडोली याठिकाणी स्क्रपचा व्यवसाय आहे.
हत्या केल्यानंतर मृतदेह एका लोखंडी पेटीत घालून कोगनोळी येथील एका ओढ्यात फेकून दिला आहे. कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करीत संशयित आरोपी सचिन व त्याच्या दोन साथीदारांनी महंमद यांना कारने कागल याठिकाणी घेवून गेले. त्याठिकाणी गेल्यानंतर आरोपींनी महंमद यांचा क्लच केबलने गळा आवळून हत्या केली.
दरम्यान, मृत महंमद जमादार 26 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने हुपरी पोलिसांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी तहसिम जमादार , सूरज महमंदहानिफ शेख व सौरभ पांडुरंग पाटील या तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मुख्य आरोपी आणि प्रियकर सचिन गजानन मगदूम अद्याप फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत असून पुढील कारवाई केली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारच सरळमार्गी नेते आहेत”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी, म्हणाले…
संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण…- संजय राऊत
“काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात”
Comments are closed.