बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीसोबत विहिरीत उडी घेत संपवलं आयुष्य

यवतमाळ | यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोमल उमेश उलमाले असं मृत विवाहितेचं नाव आहे. तिने आपल्या दीड वर्षाच्या श्रुती उलमाले या चिमुकलीला घेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्या केली आहे.

कोमल उलमाले या आपल्या मुलीला घेऊन रात्री घराबाहेर पडल्या होत्या. घरातील सगळे झोपलेले असल्याचं पाहून 10 च्या दरम्यान त्या घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध  केली. मात्र दोघी सापडत नसल्यानं घरच्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मारेगाव पोलिसांनी तक्रार दाखल करत कोमल यांची शोधाशोध सुरु केली.

उलमाले कुटुंबाच्या घराजवळच्या पुरके आश्रमशाळेजवळ, थेरे यांच्या शेतातील विहिरीत चपला तरंगताना दिसल्या. त्या चपला कोमल यांच्याच असल्याचं लक्षात आल्यानंतर उलमाले कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. कोमल यांनी आत्महत्या केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी विहिरीत शोध घेतला. यावेळी मायलेकीचा मृतदेह आढळला.

दरम्यान, या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मायलेकीच्या आत्महत्येची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती. गावातील जवळपास सगळेजण घटनास्थळी पोहचले. या आत्महत्येनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोमल यांनी आपल्या दीड वर्षाच्या चिमुरडीसह आत्महत्या का केली? यामागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

थोडक्यात बातम्या

…म्हणून चक्क संजय राठोड यांच्याच गाडीपुढे झोपला युवक!

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला पहिलाच चेंडू, अन् दिग्गज आर्चरला ठोकला षटकार; सूर्यकुमार म्हणतो…

मोठी बातमी! मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला त्या ठिकाणी मिळाला आणखी एक मृतदेह!

मासिक पाळी दरम्यान तरुणीच्या डोळ्यातून वाहू लागलं रक्त, वाचा काय आहे प्रकरण

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते- मुंबई उच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More