बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अकोल्यात शासकीय निवासस्थानी घडला धक्कादायक प्रकार; सरकारी कर्मचाऱ्याची हत्या करून….

अकोला | अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समितीमध्ये कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याची शासकीय निवासस्थानी हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी हत्या केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला होता. मात्र, घरात सांडलेल्या रक्तावरून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी केली, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हत्या झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याचं नाव सुरेश भोजने आहे. ते तेल्हारा पंचायत समितीत चतुर्थश्रेणी पदावर कार्यरत होते. मागील काही वर्षांपासून ते त्यांच्या कुटुंबासह तेल्हारा पंचायत समितीच्या वसाहतीमध्ये राहत होते. काल त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला आहे. पहिल्यांदा ही आत्महत्या वाटत होती, मात्र ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भोजने यांच्या गळ्याला लावलेला फास पूर्णपणे टेकला नव्हता. दोरखंड आणि भोजने यांच्या मानेत बरंच अंतर होतं. त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पंचनाम्यादरम्यान पोलिसांना भोजने यांच्या गळ्यावर दोन व्रण देखील आढळले आहेत. एवढंच नाही तर ज्या खोलीत मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता, त्या खोलीत बऱ्याच ठिकाणी रक्त सांडलेलं होतं, तर घरातलं काही सामानही विखूरलेलं होतं. त्यामुळे ही आत्महत्या नसनू खून झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरु केला आहे.

दरम्यान, तेल्हारा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, त्यानंतर तपासाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती तेल्हारा पोलीस स्थानकाचे पोलीस निलेश देशमुख यांनी दिली आहे. पोलिसांकडून सध्या अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे.

थोडक्यात बातम्या

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्या तरूणाला नागपुरातून अटक!

‘…आता तुम्हीच सांगा मोदी साहेब?’; चिमुकलीनं थेट पंतप्रधानांकडे केली तक्रार, पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; संघाचा धाकड खेळाडू आयपीएलला मुकणार?

“कोरोना पूर्णपणे नष्ट होणार नाही, तो अनेक पिढ्यांपर्यंत आपल्यासोबत राहू शकतो”

‘या’ जिल्ह्यानं महाराष्ट्राचं टेंशन वाढवलं; रुग्णसंख्येत घट, पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More