बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! शेजाऱ्यानेच ढकललं 12 वर्षीय मुलीला वेश्या व्यवसायात

नवी दिल्ली | दिल्लीत एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. दक्षिण-पश्चिम दिल्लीमध्ये घराशेजारी राहणाऱ्यानेच एका 12 वर्षीय मुलीला वेश्या व्यवसायात ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 2 महिलांसह 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

संबंधित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत दक्षिण-पश्चिम दिल्लीत राहते. ती जानेवारीच्या सुरुवातीला अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी 21 जानेवारीला याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली. दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हादेखिल दाखल करुन घेतला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी आपल्या घराजवळच्या दुकानात चिप्स घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी अपहरणकर्त्यांनी तिला केकचं आमिष दाखवलं आणि तिला एका घरात घेऊन गेला. तिथे तिला केक खायला दिल्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर तीचं अपहरण करुन तिला सिगारेटचे चटके दिले, तिला भयंकर त्रास देऊन वेश्याव्यवसायात ढकललं. दरम्यान, तिच्यावर अनेक पुरुषांनी अत्याचारही केले.

पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये दोन शेजाऱ्यांचाही समावेश आहे. ज्या चार आरोपींना अटक केली आहे त्यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. या रॅकेटने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. याद्वारे मुलींना ग्राहकांपर्यंत पोहचवलं जातं. हे चौघेही वेश्याव्यवसायाचं रॅकेट चालवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस आता या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील मेंबर्सचा शोध घेत आहेत आणि त्या आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या रॅकेटने अन्य काही मुलींचं अपहरण केलंय का याचा तपासही पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या

महिलासंदर्भात वागताना, बोलताना… सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश-वकिलांना महत्त्वाचा सल्ला

‘काहीजण वडिलोपार्जित संपत्ती विकून घरखर्च भागत असेल तर हे…’; रोहित पवारांची मोदींवर टीका

‘या’ कारणामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने आगामी टी ट्वेन्टी सिरीज न खेळण्याचा घेतला निर्णय!

मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More