बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हार्दिक पटेलला मोठा धक्का, भाजपने फोडले २ कट्टर समर्थक!

अहमदाबाद | गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलला मोठा धक्का दिला आहे. त्याचे दोन कट्टर समर्थक वरुण आणि रेश्मा पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. 

भाजपने आमच्या मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी नव्हे तर पाटीदार समाजाच्या न्यायासाठी हा लढा असल्याचं दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सांगितलं. 

भाजपच्या या फोडाफोडीमुळे हार्दिक पटेलला मोठा धक्का बसला आहे. मात्र हार्दिकचा भाजपविरोध आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More