बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! महेंद्रसिंग धोनीनं घेतला ‘हा धक्कादायक निर्णय

मुंबई | अनेक क्रिकेट प्रेमींच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवणारा महान खेळाडू महेंद्रसिंग धोनीने चैन्नई सुपरकिंग्सचे कर्णधार पद सोडलं आहे. जगातील एक महान आणि यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंग धोनीची ओळख आहे. आयपीएलमधील चैन्नई सुपर किंग्जचे यशस्वी नेतृत्व महेंद्रसिंग धोनीने केलं आहे. धोनीचा कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे.

महेंद्रसिंग धोनीने सीएसकेचे कर्णधार पद रवींद्र जडेजाकडे सोपवलं आहे. येत्या शनिवारपासून आयपीएलचे सामने सुरू होणार आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात प्रेक्षकांना स्टेडीयमवर जाऊन आयपीएल पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, स्टेडीयममध्ये एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना आयपीएल सामने पाहता येणार आहेत.

कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने चैन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत चारवेळा आयपीलमध्ये जेतेपद मिळवून दिलं आहे. महेंद्रसिंग धोनीची ओळख आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार अशी देखील आहे. त्याने आतापर्यंत चेन्नई संघाला अनेकदा फायनलमध्ये पोहचवलं आहे. मात्र, धोनीच्या कर्णधार पद सोडण्याच्या घोषणेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्त्व करतो. तर दोन वर्ष त्याने रायझिंग पुणे सुपरजायंटचं देखील नेतृत्व केलं आहे. त्यानंतर एमएस धोनीने चैन्नईच्या संघाला एक ओळख मिळवून दिली . यंदाचा आयपीएलचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडीयमवर चैन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये होणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले’; आठवलेंनी दिली संसदेत माहिती

टाटाच्या ‘या’ शेअरची कमाल; गुंतवणूकदार मालामाल

“पंडित जवाहरलाल नेहरूंच्या एका चुकीचे परिणाम आजही देश भोगतोय”

“महाराष्ट्र हा देशातच आहे, सांगा रे त्यांना कुणीतरी”

“आम्ही इंधन दरवाढ रोखून सामान्यांवर उपकार केले”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More