Manipur | मणिपूरमधून हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. मणिपूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या झाल्याने देशभर खळबळ उडाली आहे. जिरीबाम जिल्ह्यात कुकी उग्रवाद्यांनी मेइती समुदायातील तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण करून हत्या केली. यानंतर मोठी खळबळ उडाल्याचं बघायला मिळालं.
फक्त हत्याच नाही तर कोणाचे डोळे गायब आहे तर कोणाच्या कवटीचे हाड तुटले आहेत. या हत्याकांडानंतर लोक हादरले आहेत. शवविच्छेदन अहवालात अत्यंत हैराण करणारी माहिती आलीये. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळतंय.
Manipur पुन्हा हादरलं
आसामच्या सिलचर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आलं. 10 महिन्यांच बाळ लॅशराम लम्नगानबा उजव्या गुडघ्यामध्ये गोळी लागली होती. त्याचे दोन्ही डोळे काढण्यात आले होते. त्याशिवाय त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या.
थजांगनबी नावाच्या आठ वर्षाच्या मुलीच्या शरीरावर गोळ्यांमुळे अनेक जखमा होत्या. लमंगनबाची 31 वर्षांची काकी तेलेम थोइबीच्या छातीत तीन आणि पोटात एक गोळी लागली होती. तिच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला होता. कवटीतील हाडं तुटलेली होती.
तीन वर्षाच्या चिंगखेंगनबा सिंह, 25 वर्षांची एल हेतोनबी देवी आणि 60 वर्षांच्या वाई रानी देवी यांना गोळी मारण्यात आली होती. चिंगखेंगनबा यांचा उजवा डोळा गायब होता. त्यांच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. अपहरण करण्यात आलेल्यांवर इतके जास्त अत्याचार करण्यात आले, ज्याची कोणी कल्पनाही केली नसावी
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपची मोठी रणनीती; फक्त ‘या’ नेत्यांनाच मंत्रिमंडळात संधी मिळणार?
ब्रेकिंग! PM मोदींना जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलिसांना आलेल्या कॉलने खळबळ
गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, चांदीतही तब्बल 10 हजारांची घसरण?; जाणून घ्या दर