बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! Omicronपासून वाचण्यासाठी आता एका व्यक्तीला मिळणार ‘इतके’ डोस

नवी दिल्ली | राज्यात ओमिक्राॅनचा (Omicron) संसर्ग वाढत चालला आहे. वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात आजपासून कडक निर्बंध करण्यात येणार आहे. अशातच ओमिक्राॅनला रोखण्यासाठी लसीकरणवरही भर दिला जात आहे.

ओमिक्राॅनपासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच ओमिक्राॅनला रोखण्यासाठी बूस्टर डोस घ्यावा का असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. असं असतानाच आता जर्मनीने चौथ्या कोविड बूस्टर डोसची घोषणा केली आहे.

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनला सामोरे जाण्यासाठी लसीचा चौथा डोस आवश्यक असेल, असं जर्मनीचे आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी सांगितलं. इस्रायल आणि जर्मनी या भागात रूग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी बूस्टर डोसची घोषणा केली होती. आता चौथा डोसचीही घोषणा करण्यात आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीपासून ओमिक्राॅन (Omicron) व्हेरियंटनं राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मस्तच ना! आंतराळातील हेअर कटिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ

Omicronच्या धास्तीनं राज्यात नवे निर्बंध, आजपासून नवे नियम लागू

मुस्लीम आरक्षणावरून इम्तियाज जलील-नवाब मलिक आमने सामने

कुसुमाग्रजांची कविता, बाळासाहेबांची आठवण अन् फडणवीसांनी लगावला मुख्यमंत्र्यांना टोला

“…तर काय मजा येईल ना, मुख्यमंत्री आपण राज्यभर दौरे कराल का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More