बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! आता Omicron नंतर आणखी एक व्हेरियंट आला समोर

नवी दिल्ली | कोरोना (Corona) महामारीनं गेल्या दोन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा कहर संपत नाही तोच ओमिक्राॅननं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीच धास्ती पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्याही वाढत चालली आहे.

ओमिक्राॅन या नव्या व्हेरियंटचा वाढता संसर्ग पाहता आणि वाढती रुग्णसंख्या पाहता तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ओमिक्राॅननं नुकतंच डोकं वर काढलेलं असताना आता आणखी एका व्हेरियंटनं धडक दिली आहे.

एकीकडे ओमिक्राॅनचा संसर्ग पसरत असताना दुसरीकडे  सायप्रसच्या एका शास्त्रज्ञामे आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा (New Strain of Coronavirus) शोध लावला आहे. या नव्या व्हेरियंटमध्ये डेल्टा आणि ओमिक्राॅनचं मिश्रण असल्याचं आढळलं आहे. या नव्या व्हेरियंटचं नवा डेल्टाक्राॅन असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान, पहिलेच ओमिक्राॅननं जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण केलं आहे. अशातच आता आणखी एक नवीन व्हेरियंट म्हणल्यावर भीतीचं वातावरण पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?; वाचा आजचे ताजे दर

10 वी 12 वीच्या परिक्षेबाबत शिक्षण मंडळानं ‘हा’ मोठा निर्णय

“मुख्यमंत्री अजूनही हॉलिडे मूडमध्ये तर गृहमंत्री विकेंड मूडमध्ये”

“नरेंद्र मोदींनी सभा घेऊ नये, त्यांनी इतरांना आदर्श घालून द्यावा”

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, ‘या’ उमेदवारांना जोरदार धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More