बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोना रुग्णांचा पुन्हा धक्कादायक आकडा, पाहा आजची आकडेवारी!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 458 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 374 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 43 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 799 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,69,343 इतकी आहे. तर पुण्यात 33 हजार 858 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,30,183 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 16 हजार 446 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धडकी भरवणारी; मृत्युसंख्येत नवा विक्रम

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संपुर्ण वाहतुक व्यवस्था 15 दिवस बंद

लेकीला सांभाळायला कोणीच नाही; म्हणून स्वतःसोबत बॉक्समध्ये घेऊन फिरतोय डिलिव्हरी बॉय, पाहा व्हिडीओ

धक्कादायक!!! बेरोजगारीला कंटाळुन पुण्यात इंजिनिअर तरूणाने उचललं हे टोकाचं पाऊल

लॉकडाऊन रद्दच्या निर्णयाचा जल्लोष आला अंगलट; इम्तियाज जलील यांच्यावर झाली ‘ही’ कारवाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More