बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागरिकांनो कुटुंबाची काळजी घ्या!; दिल्लीतील डॅाक्टरांचं कोरोनाबद्दल धक्कादायक निरीक्षण

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दिल्लीत कोरोना रूग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. अशात दिल्लीतील प्रसिद्ध लोकनायक जय प्रकाश रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोरोनाबाबत धक्कादायक निरीक्षण नोंदवलं आहे.

कोरोनाचा संसर्ग प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना होतो, असं आतापर्यंत लक्षात आलं होतं. पण आता या नव्या लाटेत कोरोनाचा विषाणू प्रामुख्याने लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांना लक्ष्य करत असल्याचं दिल्लीतील प्रसिद्ध लोकनायक जय प्रकाश रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.

कोरोनाची ही लाट गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच वेगवान आहे. गेल्या आठवड्यात लोकनायक रुग्णालयात केवळ 20 बाधित दाखल झाले होते. मात्र, सध्यस्थितीत रुग्णालयात 170 रुग्ण दाखल आहेत. अशा परिस्थितीत बेड्सची संख्या वाढवणं आवश्यक आहे, असं लोकनायक जय प्रकाश रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी आजच कोरोना लसीसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. दोन ते तीन महिन्यांच्या अंतराने लस दिल्यास कोविशिल्ड ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचं अदर पुनावालांनी सांगितलं आहे. कोविशिल्ड लसीच्या प्रभाव क्षमतेबाबत दोन समूहांवर करण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षात एका महिन्याच्या अंतराने एका समूहाला ही लस देण्यात आली असता ही लस 60 ते 70 टक्के प्रभावी असल्याचं आढळलं. दुसऱ्या समूहाला दोन ते तीन महिन्यांच्या अंतरानं देण्यात आली असता लस 90 टक्के प्रभावी आढळली, अशी माहिती पुनावालांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब; अनिल देशमुखांसह महाविकास आघाडीतील 3 मंत्र्यांवर केला गंभीर आरोप

‘शरद पवारांची मनधरणी करण्यासाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितले’; सचिन वाझेंचा मोठा गौप्यस्फोट

महेंद्रसिंग धोनीचे ‘सुपर किंग्स’ यंदाही प्ले ऑफसाठी पात्र ठरणार नाहीत; ‘या’ माजी क्रिकेटपटूचा दावा

पैशांच्या अडचणीमुळे वडिलांनी चक्क आपल्या मुलीलाच विकलं अन्…

कोरोना संकटातून वाचण्यासाठी पुणे प्रशासनानं लष्कराकडे केली ‘ही’ मागणी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More