बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोग्य विभागाचं टेंशन वाढलं; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही…

पुणे | गेल्या दोन वर्षापासून कोरोनानं जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचं सावट अद्याप संपलेलं नसतानाच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. राज्यभर आता ओमिक्राॅन (Omicron) या नव्या व्हेरिएंटनं हाहाकार माजवल्याचं पहायला मिळत आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्राॅन (Omicron) राज्यभर पसरत असल्याचं पहायला मिळत आहे. यातच कल्याण-डोंबिवलीत एकाला तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी जणांना 6 तर पुण्याला एकाला ओमिक्रॉन विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये ओमिक्राॅनच्या संसर्गामुळे 6 जण बाधित झाली आहेत. यामध्ये सहापैकी तिघे जण 18 वर्षाखालील असल्याचं आढळून आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही या नव्या व्हेरिएंटची लागण होत आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेत आणखी भर पडली आहे.

दरम्यान, लसीकरण पूर्ण होऊनही ओमिक्राॅनची लागण होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाचं टेंशनही वाढलं आहे ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या विमानतळावर प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत असून प्रत्येकाची आरटीपीसीआर करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –  

गिरीश कुबेरांवर झालेल्या शाईफेकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; वाचा नेमका वाद काय?

ओमिक्रॉनबाधितांच्या तब्येतीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

“…आता भाजप मत मागायला दारात आल्यावर हे लक्षात ठेवा”

‘या’ महिन्यात Corona ची तिसरी लाट येणार, तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More