बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! Omicronच्या धास्तीनं ‘या’ ठिकाणी लाॅकडाऊनची घोषणा

नेदरलॅंड | कोरोनाचा (Corona)नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं (Omicron) चांगलचा कहर केला आहे. जगभरातील ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. ओमिक्राॅनचा वाढता धोका पाहता काही ठिकाणी लाॅकडानही (Lockdown) जाहीर करण्यात येत आहे.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग पाहता नेदरलँडमध्ये (Netherlands) लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. या लाॅकडाऊनमध्ये सर्व दुकानं, शिक्षणसंस्था, हॉटेल्स, संग्रहालये, चित्रपटगृह आणि प्राणी संग्रहायलयं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नेदरलॅंडनं जाहीर केलेल्या लाॅकडाऊनमध्ये सुपरमार्केट, वैद्यकीय, व्यवसाय आणि कार गॅरेज यांसारखी अत्यावश्यक दुकानं खुली राहतील. त्यामुळे काही नियमांमध्ये शिथिलता करण्यात आली आहे.

दरम्यान, नेदरलॅंडमध्ये जाहीर केलेल्या लाॅकडाऊनविषयी बोलताना नेदरलँडचे पंतप्रधान रुट्टे यांनी म्हटलं की, कोरोनाच्या ओमिक्राॅन व्हेरियंटनं भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. यामुळे रकारने देशात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र नेदरलँडमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावावा लागतोय याचं मला दुःख आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार’; नवाब मलिकांचा खबळजनक दावा

चिंताजनक! Omicron संदर्भात एम्सनं दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा पक्ष या देशात ठेवायचा की नाही…”

‘पालक म्हणून आम्ही आमच्या मुलीला…’; अनुष्का शर्माची पोस्ट व्हायरल

“मी नुसत्या बढाया मारत नाही, शिवसेनेचा धुव्वा उडवणारच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More