बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सासरवाडीतून आपल्या दीड वर्षाच्या मुलाला आणत बापाने पोरासोबत केलं हे धक्कादायक कृत्य

बुलडाणा | बुलडाणा येथे काळजाला हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका वडिलांनी आपल्या मुलाला सासरवाडीतून आपल्याकडे आणलं. त्यानंतर केवळ दीड वर्षाचा असलेल्या आपल्या पोटच्या पोराला फासावर लटकवून त्याला संपवलं. एवढंच नाही तर यानंतर संबंधित वडिलांनी जे केलं त्यानं सर्वांना हैराण करुन सोडलं आहे.

बुलडाणा येथील कुंदेगाव येथे रहिवासी असणाऱ्या एका तरुणाचे संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा येथील एका तरुणीसोबत लग्न झालं होत. संबंधित पतीचं नाव दिनेश असं आहे. या दोघांना काही काळानंतर एक मुलगा देखील झाला. मात्र काही दिवसांनंतर यांच्या संसारात क्षुल्लक कारणांवरुन सतत खटके उडू लागले. सततच्या भांडणांना वैतागून संबंधित पत्नी मुलाला घेऊन तिच्या माहेरी गेली.

27 मे रोजी दिनेश आपल्या सासरवाडीत गेला आणि तिथून आपल्या मुलाला घेऊन घरी आला. त्याच रात्री दिनेशने आपल्या पोटच्या अवघ्या दीड वर्षाच्या मुलाला फासवर लटकवलं. एवढच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर दिनेशने देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित पत्नीने आपला मुलगा आणि पती दोघांनाही गमवल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर एका बापानेच आपल्या लेकराचा जीव घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका

तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला अन् त्याने उचललं टोकाचं पाऊल

“मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती, त्यांनीच लक्ष घालावं”

BCCI ची महत्वाची बैठक; IPL 2021 आणि T20 वर्ल्ड कपबाबत होणार मोठा निर्णय 

4 वर्षांच्या चिमुरडीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल तिच्या धैर्याला सलाम, पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More