मेरठ | देशभरातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सरकारने चिंता व्यक्त केली आहे. नागरीकांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सरकारने केलं आहे. तर अनेक ठिकाणी मास्कचा वापर करणं अनिवार्य असून लग्नांमध्ये लोकांच्या संख्येत मर्यादा घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र काळजी घेतली जात असताना आता एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
लग्नामध्ये एक आचारी चपात्या तयार करीत असताना त्यावर थुंकत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट करण्यात आला असून यावर कारवाईची मागणी केली आहे. समोर आलेला व्हिडीओ मेरठमधील सएरोमा हॉटेलमधील असल्याचं समोर आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सना राग अनावर झाला आहे.
याअगोदरही कोविड केअर सेंटरमध्ये हलगर्जीपणा केल्याच्या अनेक घटना व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना अधिक सावधान राहणं गरजेचे आहे. सध्या लग्न, समारंभात जाणं टाळावं, किंवा अधिक काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता स्वयंपाकी प्रत्येक पोळीवर तोंड खाली करुन थुंकत आहे. आणि कोणी आपल्याला पाहत आहे की नाही हे देखील बघत आहे. अशा विचित्र माणसावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नेटिझन्सकडून केली जात आहे.
@sachingupta787 वीडियो की जांच हो ,तुरन्त कैटरर्स और सुहैल पर कार्यवाही हो ,वीडियो एरोमा होटल मेरठ की बताई जा रही है।@meerutpolice @Uppolice @dgpup @AmarUjalaNews @JagranMeerut @Live_Hindustan pic.twitter.com/8Ik1xc7AUT
— शैंकी वर्मा,प्रसपा नेता,मेरठ (@shankyvermapspl) February 19, 2021
थोडक्यात बातम्या –
महिलेनं कोरोनाचा नियम तोडला, पावती फाडण्याऐवजी पोलिसानं किस करुन सोडून दिलं! पाहा व्हिडीओ
“सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन…हाच आहे काँग्रेसचा तमाशा”
पेट्रोल भरताना तरूणाने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ
हे सरकार दारुडं सरकार आहे- सदाभाऊ खोत
अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना रिपब्लिकन पक्ष संरक्षण देईल- रामदास आठवले