पुणे महाराष्ट्र

धक्कादायक!!! पिंपरी चिंचवडमध्ये मेमरी कार्डसाठी केली मित्राची हत्या!

पुणेे | 800 रूपये आणि मेमरी कार्ड न दिल्याने मित्राने मित्राची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 15 जुलैच्या पिंपरी चिंचवडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पवन सुतार असं हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे.

पवन सुतार आणि आरोपी अनिल मोरे हे दोघेही चांगले मित्र होते. दोघेंही सुतार काम करायचे. दारूच्या पार्ट्याही सोबत करायचे. तसंच दोघात एकच मोबाईल वापरायचे. दोघांनी केलेल्या कामाची आठशे रूपये मजूरी पवनने घेतली होती. तसंच पवनला दारू प्यायला पैसे नव्हते म्हणून त्याने मोबाईलमधीव मेमरी विकून दारू घेतली. त्यामुळे दोघांचे खटके उडायला लागले.

मात्र एक दिवस दारू पित असताना आरोपीला आठशे रूपये आणि मेमरी कार्ड आठवले, त्यावरून भांडण सुरू झाली. आणि आरोपीनं दारूच्या नशेत पवनवर चाकून हल्ला केला. त्याच पवनची हत्या झाली. मात्र हा तपास करण्यासाठी पोलिसांना एक महिना लागला.

महत्त्वाच्या बातम्या-

-केरळसाठी काँग्रेसने दिला मदतीचा हात; आमदार, खासदाराचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांना देणार

-स्फोटकं सापडल्याप्रकरणी वैभव राऊतसह दोघांना 10 दिवसाची पोलिस कोठडी

-गुजरातनेही केली केरळसाठी 10 कोटी रूपयांची मदत जाहीर

-1997 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं; भाजप महापौरांनी तोडले अकलेचे तारे

-केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केरळमधील मंत्रीही रस्त्यावर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या