बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! लाॅकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मुलाच्या हाता-पायावर ठोकले खिळे?

लखनऊ | कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. मात्र, अनेकांकडून हे नियम पाळण्यात येत नसल्याचे दिसत आहे. मास्क लावण्याबाबत गैरसमज असून अनेकजण मास्क लावत नाही. त्यामुळे लाॅकडाऊन नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना पोलिस वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा देत असल्याच्या अनेक बातम्या येत असतात. मात्र यावेळी पोलिसांनी तर सगळ्याच सीमा पार केल्याचं समोर येत आहे.

बरेलीतील बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रंजीत या तरुणानं मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी त्याच्या हातापायात खिळे ठोकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, तो रात्री साधारण 10 वाजता घराच्या बाहेर बसला होता. पोलीस रात्रीची गस्त घालत होते. यावेळी रंजीतला त्यांनी पकडलं. पोलीस त्याला ठाण्यात घेऊन गेले आणि हात-पायावर खिळे ठोकले. शिवाय रंजीतला खूप मारहाण करण्यात आल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. रंजीतची आई शीला देवींनी ठाण्यात पोलिसांविरोधात तक्रार केली आहे.

मुलाच्या आईने पोलिसांवर हे आरोप केलेले असतानाच अधिकाऱ्यांनी मुलगा खोटं सांगत असल्याचं म्हटलं आहे. अटकेपासून बचाव करण्यासाठी तरुणाने स्वत:च हात व पायावर खिळे ठोकले आहे, असं म्हणत एसएसपी रोहीत सजवाण यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास देखील सुरू असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

डाॅक्टर होऊ घातलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी; मित्रांनी उपचारासाठ जमवले होते पैसे

लोकांना लसी मिळत नाहीत आणि ‘या’ तीन राज्यात वाया जातात सर्वाधिक लसी!

शाब्बास पुणेकर! पुण्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची दिलासादायक आकडेवारी

पोलिसांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचं उल्लंघन करत बर्थडे सेलिब्रेशन करणं शिवसेना नेत्याला पडलं महागात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More