बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचं औषध समजून प्राशन केलं विषारी औषध अन्…

पुणे | अनेकदा चुकीची औषधे घेतल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र, बारामतीत एक विचित्र घटना घडली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून चक्क विषारी औषध प्राशन केलं आहे. बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये काम करत असलेल्या या कर्मचाऱ्याचे नाव पोपट दराडे आहे.

बारामती ग्रामीण पोलीसमधील दराडे यांनी खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोपट दराडे हे आपली ड्युटी बजावून घरी आराम करीत होते. त्यांना सलग दोन-तीन दिवस खोकला येत होता.

रात्री त्यांनी खोकल्याचे औषध समजून शेतीत फवारणी करण्याचे ‘टू फोर्टी’ नावाचे औषध प्राशन केले. दराडे यांना थोड्या वेळानंतर त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांनी घरच्यांना, मी हे औषध प्यायलो आहे, असं सांगितलं.

दरम्यान, घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णलायात दाखलं केलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दराडे यांचे मूळ गाव इंदापूर तालुक्यातील अकोले आहे. दराडे यांना दोन मुले पत्नी असून त्यांनी पोलीस सेवेत 24 वर्षे आपली सेवा बजावली आहे. पुणे शहर, देहूरोड, इंदापूर, बारामती शहर व गेली पाच वर्षे ते बारामती तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनला कार्यरत होते.

थोडक्यात बातम्या –

“वाझेंनी एनआयएला असं काय सांगितलं की शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

व्यायाम करतानाचा मांजराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

रिक्षा आणि कारच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर

जनता आधीच लॉकडाऊनला कंटाळली आहे, त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावणं हा पर्याय नाही- प्रफुल्ल पटेल

“संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More