बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

54 वर्ष विधानसभेत राहिलेल्या आमदाराच्या नातवाचा धक्कादायक निकाल

पंढरपूर | तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विक्रम रचणाऱ्या 94 वर्षीय गणपतराव देशमुख यांचा गड राखण्यात नातू अनिकेत देशमुख यांना अपयश  आलं आहे. सांगोला मतदारसंघातून शेकापच्या तिकीटावर निवडणुकीत उतरलेल्या अनिकेत देशमुखांना मतदारांनी नाकारलं.

अनिकेत देशमुखांना 98 हजार 696 मतं मिळाली, तर विजयी झालेले शिवसेनेचे शहाजी बापू पाटील यांना 99 हजार 464 मतं मिळाली. अनिकेत देशमुखांना या अटीतटीच्या लढतीत 768 मतांच्या फरकामुळे निसटता पराभव स्वीकारावा लागला.

सांगोल्यातून शिवसेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांनी बाजी मारली आहे. गेली 54 वर्ष सांगोल्याचं नेतृत्व करणाऱ्या गणपतराव देशमुख यांना निवडणुकीत उतरण्याचं आवाहन जनतेने केलं होतं. मात्र देशमुखांनी समर्थकांचा आग्रह मोडत निवडणुकीत न उतरण्याच्या भूमिकेवर ठाम राहणं पसंत केलं.

दरम्यान, गणपतराव देशमुख यांनी 2014 मधील सांगोला विधानसभा निवडणुकीत 94 हजार 374 मतं मिळवत एकहाती विजय साकारला होता.

 

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More